पदन्यास – कृष्ण स्तुती

0 comments 0 minutes read

Loading

Loading

या देहाला रूप असे
अन् कांती तेजस्वी
रेखाटले चित्र जणु
आत्मप्राण ओतूनी…

मृगनयन कोमल
हास्य मोहमयी
आकर्षिले सर्वदा
होऊनी मोहिनी…

नयन आतुरले
राधा ही गुंतली
मीरा तुज साठी
देहभान हरपली…

सुमधूर सूर बासरीचे
का कसे दुरावती
तारांगण ही नभी
का रुसूनी परतती…

सर्वांसी भाळतो
सावळा श्याम जरी
मन चंचल आसूसती
स्थापण्या हृदय मंदिरी…

…ऊर्जा

guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted