37
![]()
उबेत तुझ्या कुशीत
विसावले इवलेपण
मायेच्या पदराला
नाही कुठले दुजेपण…
मुठीतल्या तांदुळाला
भाताचा मऊपणा
हृदयाला भोके पाडून
भरवी गूळ दाणा..
लहानपण सरलं
नकळत आपसूकच
आई झालीस तू
ताई नव्हतीसच…
दारात लोकांच्या
हात पसरावे लागे
दाणा दाणा घेऊन
आपली भूक भागे…
आई बापा विना
पोरके झालो नाही
मायेचा ओलावा
तुझ्या डोळ्यात पाही…
… ऊर्जा
A deeply moving tribute to a sister who became a mother in every way that mattered. ❤️ The love, sacrifice and quiet strength in these verses are beautifully expressed. “You became a mother; you were never just a sister” — that line stays with you. Beautifully written. ❤️