बाप्पा – एक संवाद मनापासून

0 comments 1 minutes read

Loading

Loading

बाप्पा -एक संवाद मनापासून

पोहोचला ना रे बाप्पा, सुखरूप घरी?
पृथ्वीवरील गोंधळ पाहून, आली नाही ना घेरी?

तुझ्या आगमनाची असते आतुरता घरोघरी,
करतात स्वागताची जय्यत तयारी सर्वतोपरी.
पण या जल्लोषात जातोय का मनुष्य वाहवत?
उत्सवाचा खरा अर्थ जातोय का दुरावत?

नाच, गाणी, DJ, धिंगाणा, मोठ्या आवाजाचा,
होत असेल ना त्रास तुलाही या ढासळलेल्या नीतिमत्तेचा?
हरवला आहे भक्त चढाओढीच्या शर्यतीत
अन भक्ती हरवली आहे दिखाव्याच्या गर्दीत.

अर्थ या उत्सवाचा सांगण्या,
घ्यावा लागेल का जन्म परत त्या टिळकांना?
की तूच देशील सुबुद्धी,
तुझ्या या भक्तांना?

बाप्पा, एकदा अडून तर बघ,
म्हणावं, “नाही येणार मी पुढल्या वर्षी!”
थांबवला नाही जर का तुम्ही
गोंधळ हा उत्सवाच्या नावाखाली…

तू आहेस बुद्धीदाता,
तू आहेस लाडका सर्वांचा.
ऐकावे लागेल सगळ्यांना,
प्रेमापोटी बाप्पाच्या.

स्वागत करू नव्या उत्साहाने,
राखून मान तुझा.
पुढल्या वर्षी नक्की ये बाप्पा,
वाट पाहतो भक्त आतुरतेने तुझा!

— आसावरी

guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted