मला सांगा..…….सुख म्हणजे नक्की काय असतं?
![]()
नमस्कार मंडळी. नवीन वर्षातला आज पहिला दिवस ; या नवीन दिवसाच आणि सुरू झालेल्या नवीन वर्षाच औचित्य साधून पुन्हा तुमच्या भेटीला येत आहे याचा मला खूप आनंद आहे.खरतर कोणत्या विषयावर लिहावं? यावर माझं ठाम मत काही बनत नव्हतं…..पण अखेरीस एक विषय जो माझ्या स्वतःच्या जिव्हाळ्याचा आहे यावरच दोन शब्द उतरवण्याचा मी निर्णय घेतला. आशा करतो आपल्याला तो नक्की आवडेल. दिवाळीच्या सुट्टीनंतर पुन्हा कामावर रुजू झालो आणि नेहमीच रूटीन म्हणजे सकाळची सात वाजून 20 मिनिटांची चर्चगेट लोकल पकडण्याची माझी लगबग चालू झाली. नेहमीप्रमाणे 7:20 लोकलमध्ये चढलो आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला बसायला दुसरी सीट मिळाली.कारण सहजच होत…दिवाळीच्या सुट्टीहून बरेच लोक अजून पुन्हा कामावर रुजू झाले नव्हते.दुसऱ्या सीटवर बसलो आणि डोळे बंद करून शांत बसून दिवसभराचा आढावा मनात गोळा करू लागलो. पुढच्या स्थानकावर गाडी थांबली. लोक चढू आणि उतरू लागले आणि लोकलने वेग धरता मागून कुणीतरी ओरडले…….गेलं गेलं……पाकिट गेलं……..लोकांच गोंधळ सुरू झाला पण आता काहीच उपयोग नव्हता. पाकिट मारणारा ऑलरेडी फलाटावरून निघून गेला आणि ज्या व्यक्तीचं पाकीट गेलं तो ट्रेन मध्ये चढून झाल्यामुळे आतच राहिला.तो इसम माझ्या शेजारच्या बाकड्यावर येऊन बसला…पाकिट गेल्यामुळे तो बराच निराश आणि थोडा घाबरागोबरा. झालेला होता.आता नक्की काय करावं? या प्रश्नाचं वादळ त्याच्या डोक्यात घुमत असावं याचा आम्ही अंदाज बांधलाआणि इतक्यात एक आवाज आला…..तुम्ही भाग्यवान आहात,.. एक हाथ ….पाकिट गेलेल्या इसमाचा खांद्यावर ठेवून……आणखीन एक इसम बोलू लागला खरतर..पाकिट गेल्यामुळे तो दुखावला गेलेला इसम आधीच कावराबावरा झाला असताना……तुम्ही भाग्यवान आहात.असे शब्द ऐकून तो आणखीनच चिडला. रागाच्या भरात त्याने ते इसमाला प्रश्न केला पाकिट जाणं हे भाग्याचे लक्षण आहे का?पाकिटामध्ये माझे ₹2000. होते……..काही महत्त्वाची कागदपत्रे होती ….सर्व गेली आणि वरून तुम्ही मला भाग्यवान आहात असं म्हणता.तुम्हाला काय कळणार? माझ दुख ? त्यावर तो दुसरा इसम बोलू लागला….. तुमच्यासारखं पाकीट…नवे ब्रीफकेस…. दोन आठवड्यापूर्वी माझीही गेली. त्यामध्ये माझा पासपोर्ट , आईच्या हॉस्पिटलचे पेपर , ₹15,000 ची कॅश, आणि काही घराची महत्त्वाची कागदपत्रे होती….सर्व गेल….या सगळ्या गोष्टी पुन्हा मिळवण्यासाठी आता पुन्हा मला प्रयत्न करावे लागणार आणि हे सर्व करण्यासाठी बराच खर्च पण होणार तो वेगळाच.माझ्या झालेल्या नुकसानापेक्षा तुमच नुकसान खूपच कमी आहे ….म्हणून म्हटलं तुम्ही भाग्यवान आहात. हे सर्व ऐकल्यावर पाकिट गेलेल् थोडा सावरला आणि हळू आवाजात तो म्हणाला हो खरंच…माझ्या झालेल्या नुकसानापेक्षा तुमचं झालेलं नुकसान मोठं आहे….काळजी घ्या…रेल्वेतल वातावरण नॉर्मल झालं आणि ते दोघे इसम आपापल्या मार्गावर निघून गेले…. दिवस दुसरा…..वार, मंगळवार…..सकाळची 7:20 लोकल पकडली आणि पुन्हा बसायला जागा मिळाली या सुखाने मी निवांत झालो. शेजारी 40-45 वर्षांचे एक गृहस्थ आपल्या मुलासह बसले होते.तो मुलगा थोडा अस्वस्थ वाटत होता.आता आपण डॉक्टरकडे गेल्यावर तुला नक्की बरं वाटेल…असं काही तरी ते त्या मुलाला वारंवार सांगत होते पण त्याचबरोबर ट्रेन जसजशी पुढे सरकत होती तसतशी वडिलांच्या चेहऱ्यावरची टेन्शन मात्र वाढत होती.अधूनमधून खिशातला रुमाल काढून डोळ्यातील पाणी टिपण्याचा प्रयत्न त्याचे वडील करत होते हे स्पष्ट दिसत होतं. त्याची चलबिचल पाहून मलापण राहवेना म्हणून काहीतरी निमित्त काढून त्यांच्याशी संवाद साधण्याचा मी प्रयत्न करणार इतक्यात पुन्हा एक आवाज आला….तुम्ही भाग्यवान आहात…. अस कोण कोणास बोलत आहे? या विचाराने मी आणि ते वडील मागे वळून बघणार इतक्यात एक इसम , डोळ्यावरचा चष्मा सावरत पुढे आलाच् …त्या निराश असलेल्या वडिलांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला खरंच तुम्ही भाग्यवान आहात? तो इसम आता आणखीन पुढे बोलू लागला….मला माफ करा. तुमची माझी ओळख नाही.पण तुमच्या हातात असलेली हॉस्पिटलची फाईल, अस्वस्थ असलेला मुलगा, आणि आपल्या डोळ्यातील पाणी , याचे भाव टिपून मी अंदाज बांधला ….काहीतरी महत्त्वाच्या ट्रीटमेंटसाठी आपण हॉस्पिटल मध्ये जात असणार्….गेल्या वर्षी मी सुद्धा असाच माझ्या सहा वर्षांच्या मुलाला घेऊन आमच्या घराजवळच्या हॉस्पिटल मध्ये वारंवार जात होतो. डॉक्टर काय सांगतील या विवंचनेत कित्येक महिने अस्वस्थ होतो.आणि ज्याची भीती होती तेच झालं. माझ्या मुलाचे सर्व रिपोर्ट बघून … आता आपण काहीच करू शकत नाही.ऑलरेडी लेट झाला आहे…….xx हा आजार करोडो लोकांमध्ये एकाला होतो.आणि दुर्दैवाने आपला मुलगा यामधला एक आहे.डॉक्टरांनी हात टेकले , आम्ही हतबल झालो , आणि काही महिन्यातच, तो आम्हाला सोडून गेला. आज या गोष्टीला सहा महिने झाले. कामाच्या व्यापात मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला.पण पत्नी अजूनही तो गेल्याच्या दुःखाचे सत्य विसरू शकली नाही.म्हणून तिची मानसिक स्थिती खालावत जात आहे.तिला कसं सावरू?या सत्याकडे कसं बघायला सांगू?या विचाराने माझे मनही स्थिर नाही. तुमच्या मुलाकडे बघून तो नक्कीच स्ट्रॉंग आहे.नवीन औषध उपचाराने तो नक्की बरा होईल याचा मला विश्वास आहे.पुढच्या काही महिन्यात तो पूर्णपणे बरा होईल आणि पुन्हा तुमच कौटुंबिक आयुष्य सुरळीत होईल यावर मला विश्वास आहे. तुमची आताची परिस्थिती माझ्यापेक्षा नक्कीच चांगली आहे म्हणून म्हटलं तुम्ही भाग्यवान आहात…..माझ्या शब्दाने तुमचे मन दुखावले असेल तर मला क्षमा करा…. असे शब्द ऐकून त्या मुलांचे वडील खरंच सावरले, त्यांच्या मनाला नवीन उमेद प्राप्त झाल्यासारखे वाटले, आणि मनोमन आपली परिस्थिती बरी आहे या विचाराने ते वडील आणखीनच धीट आणि निर्धास्त मनाने त्यांच्या वाटेला निघून गेले. कालचा आणि आजचा हा अनुभव प्रत्यक्ष बघून मीही थोडा चक्रावून गेलो.अशी कोणतीच परिस्थिती आपल्या वाट्याला आली नाही , म्हणून मी मनोमन परमेश्वराचे आभार मानू लागलो. दिवस तिसरा….वार बुधवार…वेळ सकाळी 7:20 लोकल…. पंचविशीतला एक तरुण घाईघाईने ट्रेनमध्ये चढला….इकडे तिकडे बघून माझ्या समोरची सीट रिकामी आहे बघून चटकन बसला, घटाघटा पाणी प्यायला , त्याच्या हातात घड्याळ नव्हते, म्हणून पटकन मला विचारू लागला….दादा ट्रेन किती वेळात चर्चगेटला पोहोचेल? मला खरं तर 7:00 ट्रेन पकडायची होती…पण उशीर झाला. मीही घडय़ाळाकडे पाहत त्याला बोललो … साधारण एका तासात म्हणजे 8:20 पर्यंत ती चर्चगेटला पोहोचेल. तो तरुण उद्गारला बापरे….30 मिनिटे लेट मी विचारलं , काय झालं? तो सांगू लागला – आज माझा पहिलाच इंटरव्यु आहे. 8:00 वाजता रजिस्ट्रेशन वेळ दिली होती.आता 8:20 ला ट्रेन पोहोचणार म्हणजे नक्कीच सेंटरवर जाईपर्यंत साडेआठ होणार.रेजिस्ट्रेशनला आता घेतील की नाही या विचाराने कावराबावरा झाला.तोंडातल्या तोंडात कसलातरी जप करू लागला.इंटरव्युला काय प्रश्न विचारतील याची प्रत त्यांच्याकडे होती त्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याचे लक्ष लागेना त्याच्या या अवस्थेला मी जबाबदार नसलो तरीही मी काय करू शकतो याचा विचार करत होतो. इतक्यात पुन्हा तोच आवाज…..तेच शब्द…..आमच्या दोघांच्या कानी पडले. तू भाग्यवान आहेस…. तरुणाने त्याचा पाठीमागच्या सीटवर बसलेल्या , आणि पाठमोर्या इसमाकडे मान वळून उद्गारला…..खरंच तू भाग्यवान आहेस. अहो महाशय सकाळी सकाळी माझी अशी मस्करी करू नका?भाग्यवान या शब्दाचा आणि माझा दूर दूरचा संबंध नाही.तुम्हाला माझी परिस्थिती माहीत नाही.{काहींच्या चिडलेल्या स्वरात तो तरुण बोलत होता} मला वडील नाहीत.आई घरकाम करते. ती ने दिवस रात्र केलेल्या कष्टामुळे मी ग्रॅजुएट होऊ शकलो.मला एक लहान बहिण आहे.ती शाळेत शिकत आहे.परिस्थिती नसताना जिवाचे रान करून आई आम्हाला शिकवत आहे. आईचा हा कष्टाचा भार हलका करावा म्हणून ग्रॅज्युएशन नंतर आज पहिल्याच इंटरव्ह्यूला जात आहे. पण घरातून निघायला उशीर झाला.आता
VISION 2026!
![]()
1/1/2026 is not just passing of 31/12/2025! It is a year which has gone by and another year to look forward to! Do we have a VISION in place?