The Positive Diary

"एक अद्भुत घड्याळ"

Loading

नमस्कार मंडळी

माणसाचं जीवन हे त्याच्य श्वासाबरोबरच ,  घडय़ाळाच्या काटय़ावर जास्त चालत असतं असं म्हणतात.

बघाना , प्रत्येकाची काम ही त्या त्या वेळेनुसार ठरलेली आणि आखलेली असतात. 

लांब कशाला स्वतःच्या अनुभवावरून सांगतो , 7:00 वाजता उठणे , 8:00 वाजता रेडी होऊन ऑफिसला , मग नऊ ते सहा जॉब झाल्यावर पुन्हा संध्याकाळी 7:30 च्या आत घरात , 8:00 वाजता फ्रेश होऊन दिवसभराच्या घडामोडींचा आढावा ,मग टीव्ही पाहत 9:00 वाजता जेवण , 10:00 वाजता शतपावली , थोडस वाचण् , आणि मग 11:00 वाजता बिछाना. , दुसऱ्या दिवशी पासून सेम रूटीन.

हा….त्यातल्या त्यात शनिवार, रविवार किंवा सुट्टीचा आणखी कोणता दिवस असेल तर अडकलेली काम मार्गी लावण्यासाठी केलेले नियोजन. सर्व कसं घडय़ाळ्याच्या काटय़ावर , अगदी काटेकोरपणे , अगदी बिनचूक…. 

आपलं आयुष्य किती डिपेंडेंट असत ना या घडाळ्याच्या काट्यावर? आणि त्याने नमूद केलेला वेळेवर.

कोणी शोध लावला असेल या मानव निर्मित 24 तास दर्शवणारा घडाळ्याचा??

या मानव निर्मित घडाळ्याच्या काट्यावर सर्व विश्व चालत असतं , अगदी अविरतपणे , न चूकता , आणि म्हणूनच की काय? आपण त्या घडाळ्याचें  एक प्रकारचे सेवक झालेल असतो.

याच्याशिवाय आपले कोणतेच काम वेळेवर होणार नाही ,  मार्गी लागणार नाही ,  अशा गोड गैरसमजुती मध्ये आपण आपले जीवन जगत असतो.

पण आताच होऊन गेलेल्या वैश्विक महामारी म्हणजे कोविडने हे दाखवून दिले की मानव निर्मित हे घडय़ाळाचे काटे आणि त्यावर दर्शवली जाणारी वेळ ही काही खरी नाही.

खरी वेळ , खरे वैश्विक चक्र हे अविरतपणे चालू असते  ते एका विशिष्ठ शक्तीमुळे, आणि त्याच्या न थांबणारे गतीमुळे. 

ज्याला आपण यूनिवर्सल क्लॉक किंवा वैश्विक शक्तीची वेळ असेही म्हणू शकतो.

काय असू शकतं हे यूनिवर्सल क्लॉक? [ माझ्या भाषेत अद्भुत घड्याळ]

कोविडचे  उदाहरण वगळता , मी माझ्या स्वतःच्या आयुष्यात घडलेला एक प्रसंगआणि त्याचा खुलासा करून सांगतो.ते जास्त सोपं जाईल.

ही घटना म्हणजे माझा “मलेशियातला जॉब”.

परदेशात काम करण्याची संधी मिळावी म्हणून मी वयाच्या साधारण 22/23 वर्षांपासून प्रयत्न करत होतो.माझे प्रयत्न जवळजवळ नऊ वर्षे चालू होते. या नऊ  वर्षात मला जिथे संधी मिळेल तिथे मी अप्लाइ करत होतो , वशिलेबाजी लावत होतो , प्रोफेशनल रेफरन्स देत होतो , पण यश काही पदरात पडत नव्हते , आणि तरीही माझे प्रयत्न हे चालूच होते…

आणि अचानक माझ्या मनात पासपोर्ट रिन्यूअलचा विषय आला. अर्थात जुना पासपोर्ट काढून मला अलमोस्ट 10 वर्ष होणार होती. त्या वेळी ऑगस्ट [2015]  महिन्यामध्ये पासपोर्ट रिन्यूअलची अवेलेबल डेट काय आहे म्हणून चेक करत होतो. तोच लगेचच मला त्याच आठवड्याच्या शनिवारची डेट मिळाली , आणि ती संधी मी न दवडता लगेच पासपोर्ट रिन्यू करण्यासाठी दिला.एका आठवड्याच्या आत मला माझा नवीन पासपोर्ट मिळालासुद्धा…

आधीचा जुना पासपोर्ट असाच वाया गेला ,अर्थात त्याचा उपयोग परदेशवारीसाठी झाला नव्हता,  म्हणून नवीन पासपोर्ट हातात आल्याआल्या तो मी  देवासमोर ठेवला , आणि मनात म्हटलं हे देवा या नवीन पासपोर्ट चा तरी वापर मला परदेश दौरा करण्यासाठी होउ दे रे बाबा…असं बोलून मी माझ्या कामाला लागलो.

ऑक्टोबर महिना साधारण , तारीख 20 ऑक्टोबर असावी.

अचानक मोबाईल वाजला.कॉल उचलला तर बॅंग्लोरमधून कोणा एका कन्सल्टन्सीचा तो कॉल होता.

समोरूनआवाज आला , आमच्याकडे मलेशियासाठी एक अर्जंट ओपनिंग आहे , तुमचा प्रोफाईल मॅच होतोय ,जर इंटरेस्टेड असाल तर प्लीज CV शेअर करा. मि तो कॉल काही सिरियसली घेतलं नाही….कारण गेल्या नऊ वर्षात मला इतक्या एजन्सीचा कॉल येऊन गेला होता , पण काम मात्र कुठेच झालेले नव्हते. 

अशा कॉलला आता जास्त सिरियसली घ्यायचं नाही म्हणून CV शेर करतो असं म्हणून मि कॉल बंद केला.

थोड्या वेळाने CV शेअर केल्यावर , त्याच एजन्सीचा पुन्हा कॉल आला…..

 सर , ओपनिंग खूप अर्जंट आहे , तुमचा प्रोफाईल नेक्स्ट राउंड साठी  शॉर्ट लिस्ट झाला आहे ,  जर तुम्ही एका आठवड्यात रुजू करत असाल तर इंटरव्यू अरेंज करू….अस ऐकल्यावर नक्कीच हा  एक फ्रॉड कॉल्स आहे ,  यावर माझा विश्वास बसला…कारण मलेशियासारख्या देशात एका आठवड्यात जाणं [ Job VISA] कसं शक्य आहे? असा प्रश्न मी करताच सर आम्ही ते सर्व मॅनेज करू पण तुमची तयारी आहे का फ्लाइ करायची?

मी म्हंटल इन्टरव्ह्यू झाल्यावर सांगतो.आणि त्याच दिवशी पॅनलसोबत इन्टरव्ह्यू अरेंज झाला…. तोही फक्त 20 मिनिटांचा.जस्ट फॉरमॅलिटी असावी असं मला वाटलं…

आणि दुसर्या दिवशी लगेच , म्हणजे 21 ऑक्टोबर ला मला कन्फर्मेशन आलं , कि मी जॉब साठी सिलेक्ट झालो आहे.पासपोर्ट सबमिट करायचा होता विजा प्रोसेस आणि स्टम्पिंग साठी.

मला खरं तर हा खूप मोठा धक्का बसला होता…आणि त्याच वेळेस मनात धडकी भरली होती.

हे सर्व सत्य आहे की स्वप्न.? कुटुंबातले सर्वजण पण काळजीत पडले.

हे पाऊल उचलावं की नाही या संभ्रमात मी होतो…पण त्याचवेळी , आलेली ही संधी सोडायची नाही , आणि प्रत्येक गोष्टीला थोडी बहुत तरी रिस्क असतेच असा विचार करून हा जॉब घेण्याचा निर्णय घेतला.

लगेचच माझा पासपोर्ट वीजा स्टॅम्पिंगसाठी चेन्नईला कुरिअर केला. मला खरं तर सर्वत्र अंधारच दिसत होता आणि त्यातून मला मार्ग काढायचा होता.कारण सर्व काही इतक्या वेगाने,  अनपेक्षितपणे होत होते की कोणालाच विश्वास बसणार नाही.

या अंधार रस्त्यावरून चालण्याआधी माझ्याकडे फक्त एक छोटासा आशेचा  केरण  होता , आणि तो म्हणजे  जिजु [जे ऑलरेडी मलेशियामध्ये जॉब करत होते.]

जेव्हा ऑफर लेटर हातात पडले तेव्हा ते वॅलिड आहे की नाही? अमुक अमुक कंपनी तिकडे खरच अस्तित्वात आहे का? याचा पडताळा करण्यासाठी मला जिजु नि खूप मदत केली. मिळालेल ऑफर लेटर मी त्यांना ईमेल केल , आणि त्यांनी लगेचच ते लेट्टर वॅलिड आहे की नाही याची शहानिशा  त्या कंपनीमध्ये प्रत्यक्षात कॉल करून , नावांसहीत, त्यांच्या दिलेल्या पत्त्यासहित वेरिफाइ करून बघितल….आणि मिळालेली ऑफर ही वॅलिड आहे  तू येऊ शकतोस असा शब्द कानी पडल्यावर मला थोडसं हायसं वाटलं. या गोष्टीचा पडताळा झाल्यावर मी अर्धा गड राखला होता, आणि बाकीचा अर्धा तिकडे जाऊनच प्रत्यक्षात राखायचा असा निर्णय करून मी एकदाचा 30 ऑक्टोबर 2012 ला फायनलि मलेशियाला येऊन पोहोचलो.

एक प्रकारे चमत्कार व्हावा अशा पद्धतीने मी एका आठवड्यात मुंबई ते मलेशिया हा अनुभव घेऊन आलो होतो.

माझा हा असा पहिला विमान प्रवास करताना मी एकटाच होतो , आणि त्याच रात्री प्रवास चालू असताना पुन्हा एकदा माझ्या मनात काहीतरी गुपित दडलय आणि त्याचा शोध मला घ्यायचा आहे असा आवाज मला येऊ लागला. 

हां घडलेला अनुभव कधी तरी एकदा कागदावर मांडून लोकांसोबत शेअर करण्याचा ध्यास मनाला लागला. त्या रात्री खूप प्रश्न माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले…जसे की….

  • का? माझ्या प्रयत्नांना नऊ वर्षांनीच यश यावे.
  • का?मी इतकी वर्ष अनेक प्रयत्न करून , हज़ारो ऍप्लिकेशन करून देखील, मला अशा कंपनीमधून ऑफर मिळावी जिचे मी कधी नावही ऐकले नसेल….आणि ना कधी त्या कंपनीमध्ये अप्लाइ केले असेल
  • का? माझा पासपोर्ट एक महिना आधीच रीन्यू  व्हावा….आणि तोही अगदी विनासायास.
  • या कंपनी मध्ये माझा कोणी रेफरन्स म्द्यावा असेही कोणी नव्हता….तरीही या कंपनीमध्ये माझ्या CV मिळावा….आणि माझं सिलेक्शन इतक्या अर्जंट पद्धतीने व्हाव?

हे सर्व का?आणि कसं काय? 

या आणि अशा बऱ्याच प्रश्नांच काहूर मनात चालू असताना एक गोष्ट ध्यानात आली…

ते म्हणजे ज्या मानव निर्मित घडाळ्याच्या काट्यावर अर्थात वेळेवर , मी माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण मोजून मापून जगत होतो…..सर्व गोष्टींचे नियोजन करत होतो…….ते खरं तर या घडाळ्याच्या काटय़ावर कधि अवलंबून नव्हतच….. याच्या पलीकडे , आपल्या विचारांच्या ही फार पलीकडे एक अज्ञात चक्र फिरते आहे. या चक्रामध्ये सर्व घटना आधीपासूनच कालबद्ध आणि नमूद करून ठेवल्या आहेत. असं हे ब्रह्मांडाचं गणित जे आपल्या विचाराच्यापलीकडे आहे , ते अद्भुत चक्र म्हणजेच यूनिवर्सल क्लॉक किंवा वैश्विक शक्तीची वेळ.

या अशा यूनिवर्सल क्लॉकची घंटा माझ्या मनामध्ये वाजली आणि मग हळूहळू सर्व प्रश्नांची उत्तर उलगडत गेली.

या पृथ्वीतलावर आपण जसा देश बदलतो तसे तिकडचे वेळही कमी अधिक प्रमाणात बदलत असताना आपण पाहतो.

पण या यूनिवर्सल क्लॉकचं तसं नाही….तुम्ही कोणत्याही देशात , कुठल्याही शहरात असाल , ही वेळ आणि याचे नियम सर्वांसाठी सारखेच असतात.

आपण कधी झोपायचे , कधी उठायचं आहे , याची वेळ आपण ठरवू शकतो….पण या विश्वात आपला पहिला श्वास कधी घ्यायचा आणि शेवटचा कधी हे आधीच यूनिवर्सल क्लॉकमध्ये नमूद असतं आणि  त्याप्रमाणेच आपलं आयुष्य प्रत्येक क्षणाला बदलत असतं.

च्कधी कधी आपण सहज बोलून जातो , अमुक एक गोष्ट माझ्या नशीबात खूप लवकर मिळाली किंवा तमुक एक घटना माझ्या आयुष्यात फार उशिरा घडली….पण सत्यात तसं काहीच नसतं…..या ब्रह्मांडाच्या वेळेनुसारं आपल्याला प्रत्येक गोष्ट तेव्हाच मिळते जेव्हा त्याची योग्य वेळ आपल्या प्रारब्धात लिहलेलीअसते.

ब्ब्रह्मांडाचं हे गणित कधीच चूकत नसतं आणि त्यामुळे कधी कोणावर अन्याय होत नसतो.

प्रत्येकाला त्याच्या कुवतीप्रमाणे ,  योग्यतेनुसार योग्य वेळी सर्वकाही प्रदान होत असत.

आपण मानव निर्मित घड्याळ्याची वेळ नेहमीच पाळत असतो.पण या निसर्गनिर्मित ब्रह्मांडाच्या वेळ ची आपण खरंच कदर करतो का? मला विचाराल तर नक्कीच नाही.

आपण तसे करत नाही , म्हणूनच वेळोवेळीआपल्याला निसर्गरुपी वादळांचा , महामारींचा सामना करावा लागतो.

या संकटाची पूर्वसूचनासुद्धा हे ब्रह्मांड आपल्याला वेळोवेळी देत राहतो , पण मनुष्य नावाचा प्राणी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून.स्वतःच्या स्वार्थासाठी आणि उन्नतीसाठी निसर्गाशी खेळ करतो.

याचे सध्याचे उदाहरण म्हणजे कोविड….या कोविडने पुन्हा एकदा दाखवून दिले की निसर्गाची कदर जर केली नाही तर मानव निर्मित घड्याळ , त्याची वेळ आणि त्यावर चालणारे मानवरूपी प्राण्याला थांबवायला निसर्गाला वेळ लागणार नाही…आणि ते झालेच…..याचा अनुभव जगातल्या प्रत्येक माणसाने घेतला…

या सर्व गोष्टींची उकल झाल्यावर मी माझ्या जीवनात काही बदल करण्याचे ठरवले , आणि त्याचा मला फायदाच झाला.

ते असे….

  1. कृष्णाने केलेल्या गीतेच्या उपदेशानुसार…..जो हो रहा है  वह अच्छा हो रहा है , और जो होगा वह अच्छा ही होगा.या उपदेशाची जाणीव कायम मनात ठेवल्याने आलेल्या प्रत्येक घटनेला जिद्दीने सामोरे जाण्याची ताकत आणि उमेद मला मिळत राहते.
  2. कोणत्याही भौतिक सुखाचा हव्यास न करणे….पदरी पडले आणि पवित्र झाले या तत्त्वावर जगणे.कारण माझ्या पूर्वकर्मानुसार माझ्याकडे जे चालून येत आहे ते माझ्यासाठी योग्यच आहे…आणि त्यासाठी मी कृतज्ञ आहे.
  3. करम करो फल की इच्छा मत करो.कर्माचे स्वातंत्र्य आपल्याला आहे , आणि ते आपल्याला केलच पाहिजे.पण त्या कर्मावर मला अमुकच फळ मिळावं ही अपेक्षा बंद करून , या उलट आपण केलेल्या मेहनतीनुसार , योग्य वेळ आली की आपल्याला त्याचे योग्य ते फळ मिळणारच याचा विश्वास आपोआप मनात निर्माण केला. 
  4. एखाद्य यश किंवा स्वप्न पूर्ण होण्यास [आपल्या इच्छेनुसार] वेळ लागत असेल , तर नशिबाला दोष न देता योग्य वेळ आली की सर्व काही ठीक होणारच ऱ्यावर असलेला पूर्ण विश्वास.
  5. एखाद्या मोठ्या संकटात किंवा दुःखात असल्यावर हे दिवस कधीच संपणार नाहीत , असा नकारात्मक विचार न करता वेळ ही सर्व समस्यांची रामबाण दवाई आहे , आणि ती बदलणारच याचा जप करत राहणं आणि असलेल्या परिस्थितीला सकारात्मकदृष्ट्या सामोरे जाण…
  6. आपल्या साईबाबाचा संदेश तर लाख मोलाचा आहे , आणि तो म्हणजे – श्रद्धा आणि सबुरी. यामधला श्रद्धा म्हणजे विश्वास…..आणि सबुरी…..म्हणजे आपल्या योग्य वेळेची वाट बघणे… या दोन गोष्टी जर आपण आत्मसात केल्या तर आपल्याला अशक्य असं काहीच नाही.
  7. हे मनुष्य जीवन म्हणजे निसर्गाने दिलेली अनमोल देणगी आहे.पण या जीवनाचा एक ठराविक कालावधी आपल्याला आधीच नेमून दिलेला आहे…त्यामुळे मिळालेल्या या अद्भुत वेळेचा जास्तीत जास्त सदुपयोग इतरांच्या मदतीसाठी , काहीतरी सत्कर्म करण्यात खर्ची करावा याचा प्रयत्न कायम करत राहणे.

तुमच्याही आयुष्यात तुम्हाला या अशा काही गोष्टीचा अनुभव आल्यावाचून राहिला नसेल…

  • वेळे आधी किंवा वेळेत पोहचूनसुद्धा काम मार्गी न लागणे.
  • वेळेपेक्षा उशीरा पोहचून देखील सर्व काम सुरळीतपणे पार पडणे.
  • प्रवास करताना उशीर होणे….पण त्या उशीर होण्याने कदाचित एखादा मोठा अपघात टळला जाणे. 
  • अचानक अनोळखी व्यक्तीची मदत ,  योग्य वेळी मिळून आपले काम मार्गी लागणे.
  • मुहूर्त पाहून केलेली चांगली कर्मे देखील कालांतराने नुकसान होण्यास पात्र ठरणे तर याउलट मुहूर्त न बघता केलेली काही कर्मे अपेक्षेपेक्षा जास्त चांगलं करुण जाणे………..

असं….बरंच काही…

हे अनुभव जर तुम्हाला कायम येत असतील , तर नक्की समजा कीं  विश्वनिर्मित विधाता , याने मांडलेल्या वेळेनुसार ,सर्व काही घडत आहे…आणि घडत असलेल्या त्या प्रत्येक घटनेचे साक्षी राहून , त्याचा स्वीकार करून , त्या वेळची कदर करून आपले आयुष्य मस्त मजेत जगा हीच शुभेच्छा. ..

समय से पहले , और नसीब से ज्यादा , किसी को कुछ नही मिलता……………

धन्यवाद.

Tushar K

Previous
Next

Written By

Tushar Karande

Tushar Karande

IT professional , 17+Years in experience , typical AMCHI MUMBAI guy from Thane. Loves travelling , spirituality talks , writing & dance. I live life @ Three basic principle 1. Nobody is perfect but Everyone is unique [ So respect all & their feelings] 2.Sharing is Caring [ Always share what you have , because its blessing to be helping hand for someone else] 3.Miracles Do happen - Do your best & have faith on divinity , you will get what you mean for sure.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *