The Positive Diary

आजी आजोबांची शाळा

Guest Author:Dr. Anjali Jagtap-Ramteke

Loading

दोन वर्ष वयाच्या नातवाने आजीच्या दुखऱ्या गुडघ्यावर निर्गुडीचा पाला आणून ठेवला. गुडघा खूपच दुखत होता त्यामुळे ती एका बसून होती. चेहऱ्यावर वेदना जाणवत होत्या. मग आजीच्या  चेहर्यावरचे भाव झरकन बदलले. ती वेदना विसरली. तिला आपल्या चिमुरड्या नातवाचे खुप कौतुक वाटले. माझी आजी जुन्या वळणाची प्रेमळ स्त्री होती. माझ्या आजीच्या चेहऱ्यावरचे नातवंडाना भेटल्यावरचे जे हसू असायचे ते तिच्या डोळ्यांतून चेहऱ्यावरून ओसंडून वाहायचे. तिच्या डोळ्यात पाणी यायचे आणि ती पदर डोळ्याला लावायची. मी दर वेळी हा निरोपाचा कार्यक्रम आजोळी पोहोचल्यावर आणि तिकडून परतताना बघत असे.. मग इतरही स्त्रियांचे डोळे पाणावायचे. आजीचे ते आमच्या गालावरून हात फिरवून मग ते कडाकडा बोटे मोडणे याचे मला अप्रूप वाटायचे. मला अशी दहाच्या दहा बोटे एकदम मोडता यायची नाहीत. आजी म्हणायची माया असली की बोटे मोडतात.

आजी पहाटे जात्यावर दळण दळायची. स्वतः रचलेल्या ओव्या म्हणायची. एकदा माझी आजी आणि आजोबा माझ्या गावी माझ्या चुलतभावाच्या लग्नाला आले होते. आजीने माझ्या गडद गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसली होती व डोईवर पदराची जी सोनेरी जरीची रूंद किनार होती त्याने तिचा चेहरा खुलून दिसत होता. माझ्या आजोबांनी पांढरे धोतर, लांब सदरा आणि डोईवर गर्द गुलाबी लांबलचक पटका हा त्यांचा नेहमीचा पोषाख केला होता. सर्व वऱ्हाडी मंडळीत माझे आजी आजोबा अगदी उठून दिसत होते.

दुसर्या दिवशी आम्ही सगळे बैलगाडीतून शेतावर हुरडा खाण्यासाठी शेतावर गेलो. जमिनीच्या एका छोट्या पण लांब पट्ट्यावर ते पीक घेतले होते. आजोबांनी माझ्या ते नजरेने पाहून आणि मग चालून अचूकपणे जमिनीचा तुकडा किती एकर आहे सांगितले. त्यांना बांधकाम, सुतारकाम सर्वच यायचे. बैलगाडीची गोल लाकडी चाके ते कसे बनवतात हे मी कधी पाहिले नव्हते. कारण त्याकाळी तंतोतंत गोल आकारात लाकूड कापण्यासाठी लागणारी यंत्रे नव्हती. त्यांनीसुद्धा हे सगळं इंजिनिअरिंग कॅालेजात शिकलेलं नव्हतं. पण ते त्यात पारंगत होते आणि त्यांचे मोजमाप, समतलपणा कधी चुकत नव्हता. आजोळच्या घराला जी दारे होती त्यावर कोरीव नक्षीकाम केलेलं असायचं. माझ्या आजोबांनी माझ्या आईला लग्नात दिलेला गोल गरगरीत पोळपाट आणि सुबक लाटणे अजूनही आई स्यंपाकाला वापरते.

दुसर्या दिवशी आम्ही सगळे बैलगाडीतून शेतावर हुरडा खाण्यासाठी शेतावर गेलो. जमिनीच्या एका छोट्या पण लांब पट्ट्यावर ते पीक घेतले होते. आजोबांनी माझ्या ते नजरेने पाहून आणि मग चालून अचूकपणे जमिनीचा तुकडा किती एकर आहे सांगितले. त्यांना बांधकाम, सुतारकाम सर्वच यायचे. बैलगाडीची गोल लाकडी चाके ते कसे बनवतात हे मी कधी पाहिले नव्हते. कारण त्याकाळी तंतोतंत गोल आकारात लाकूड कापण्यासाठी लागणारी यंत्रे नव्हती. त्यांनीसुद्धा हे सगळं इंजिनिअरिंग कॅालेजात शिकलेलं नव्हतं. पण ते त्यात पारंगत होते आणि त्यांचे मोजमाप, समतलपणा कधी चुकत नव्हता. आजोळच्या घराला जी दारे होती त्यावर कोरीव नक्षीकाम केलेलं असायचं. माझ्या आजोबांनी माझ्या आईला लग्नात दिलेला गोल गरगरीत पोळपाट आणि सुबक लाटणे अजूनही आई स्यंपाकाला वापरते. कोणत्याही औपचारिक शिक्षणाशिवाय आत्मसात केलेले हे कौशल्य होते.

माझी आजी तर एखाद्या बाळाच्या पोटात दुखले तर ताबडतोब तिथे दाखल व्हायची. मग तिला अवगत असणारे उपचार करून, हळुवारपणे पोट चोळून बरं करत असे. अर्थात कोणताही फिजिशियन अशा प्रकारच्या उपायांना परवानगी देत नाही. परंतू, जिथे वैद्यकीय सुविधांची मारामार तिथे माझ्या आजीचे हे ज्ञान नक्कीच उययोगी पडायचे. काही थोड्या किचकट केसेस तिने तिचे व्यवहारिक शहाणपण वापरून यशस्वीरित्या बऱ्यादेखील केल्या. कॉर्ड अराउंड नेक अशा स्थितीत असणाऱ्या बाळाला सुखरुप जन्म घेण्यासदेखील तिने मदत केल्याचे आईने मला सांगितले होते. माझी आजी शेतात मेथी, वांगी, कोथिंबीर अशा भाज्या पिकवत असे.

पुस्तके शिकून जो पदवीचा कागद मिळतो त्यामागे जर असे उपयुक्त ज्ञान आणि कौशल्यांचा विकास झाला असेल तर त्या प्रमाणपत्राला निव्वळ कागदाच्या पलीकडे अर्थ आहे. अन्यथा केवळ एक कागदी प्रमाणपत्र एवढेच त्याचे मूल्य.

ह्या सगळ्यांचा विचार केला तर माझी आजी मराठी भाषेचे रीतसर शिक्षण न घेताच ओव्या रचते, सुगरण, शेतकरी स्त्री म्हणून असणारी कामेही लिलया करते, आणि अंतर्मनातील मायेचा झरा कधीच आटू देत नाही. हे सगळे विलक्षण आहे.

अश्या जुन्या वळणाच्या प्रेमळ स्त्रिया, नातवाला पाहून मायेने पटापट गालावरून हात फिरवून दहा बोटे सहज मोडू शकणाऱ्या आज्या या पिढीत, इथून पुढच्या पिढीत असतील?

माझ्या आजीसमोर तर मी तिचे कौतुक केले नाही. तेव्हाही कौतुक होतेच. पण कधी बोलून दाखवले नाही.

पण कधी आत्मिक संवाद सध्याची कला किंवा शक्ती ईश्वरी कृपेने लाभली तर मला आजीला हे सगळं सांगता येईल.

Previous
Next

Written By

Guest Blogger

Guest Blogger

Welcome to our treasure trove! Here, you'll find a curated collection of all the posts written by our esteemed guest bloggers. Explore, engage, and be inspired by the wealth of voices within our community.

One Response

  1. Such sweet memories of a multi talented grandmother. 😍
    It’s really sad that we don’t express our love for our family members while they are alive.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *